मिरा-भाईंदर : मतदार याद्या तयार करण्याचे निवडणूक आयोगाकडून आदेश रद्द | Mira-bhayandar municipal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mira bhayandar municiple corporation

मिरा-भाईंदर : मतदार याद्या तयार करण्याचे निवडणूक आयोगाकडून आदेश रद्द

भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेच्या (Mira-bhayandar municipal) दोन प्रभागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (bye-election) मतदार याद्या (voting list) तयार करण्याचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra election commission) मिरा-भाईंदर पालिकेला पाठवले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द झाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी ही पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: डोंबिवली : उच्छाद घालणारे माकड वन विभागाच्या ताब्यात

मिरा-भाईंदरच्या दोन नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठी मतदार याद्या तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पालिकेला दिले होते. मात्र या पोटनिवडणुकीवर सरनाईक यांनी आक्षेप घेतला होता. पालिकेची मुदत पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे त्या निवडणुकीची आचारसंहिता तसेच पोटनिवणुकीची आचारसंहिता यामुळे विकास कामे ठप्प होणार आहेत. शिवाय पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांना अवघे दोन ते तीन महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी आयोगाला केली होती. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करण्याचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे पत्र निवडणूक आयोगाने पालिकेला पाठवले आहे.

loading image
go to top