
भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षकाला या विद्यार्थ्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर्षी दहावीच्या निकालात वाढ कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.