

Mira Bhayandar Municipal Corporation Election Results
ESakal
Mira Bhayandar Election Results: राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान काल संपले आहे. मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत जोरदार स्पर्धा झाली. जुलै २०२५ मध्ये, मीरा-भाईंदरमध्ये काही बाहेरील लोकांनी निषेध केला. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पाचही मतमोजणी केंद्रांवर सकाळी १०:१५ वाजल्यानंतरही मतमोजणी सुरू झालेली नव्हती. विलंबामुळे मतमोजणी केंद्रांबाहेर लोकांची गर्दी दिसून आली. यानंतर मतमोजणी सुरू झाल्यावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजप आघाडीवर दिसून आला आहे.