

Mira Bhayandar Municipal Corporation
ESakal
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत विरोधी पक्षात असलेले शिवसेना शिंदे गट व काँग्रेस एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मिळून मिरा-भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. गुरुवारी या गटाची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नागरसेवकाकडे या आघाडीचे गटनेतेपद आहे. यामुळे राज्यात आणखी एक राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे. या समीकरणामुळे शिवसेनेचा एक स्वीकृत सदस्य निवडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.