
मराठी- हिंदी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया या बड्या गुंतवणूकदारानेही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर राज ठाकरेंना आव्हान देत जाहीर केले आहे की ते मराठी शिकणार नाहीत.