मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची उचलबांगडी, पण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आवर घालण्यास असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवून मीरा भाईंदरच्या आयुक्त चंद्रकांत डांगे यांची उचलबांगडी केली आहे.

विरार :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आवर घालण्यास असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवून मीरा भाईंदरच्या आयुक्त चंद्रकांत डांगे यांची उचलबांगडी केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर वसई विरारच्या आयुक्त गंगाधरन डी. यांना दिलेले अभय चर्चेचा विषय झाला आहे. 

नक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

वसई- विरार पालिकेमध्ये दोन महिन्या पूर्वी आयुक्त गंगाधरन डी. यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आल्या पासूनच सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला विश्वासात न घेता कामाला सुरुवात केली. त्यामुळे ज्या आयुक्तांना अवघ्या चार दिवसात परत पाठविले होते, त्याच आयुक्तांना कोणत्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने परत आणले याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र केराची टोपली दाखवणाऱ्या आयुक्तांना कोणत्या मंत्र्यांचे पाठबळ मिळत आहे हे आता लपलेले नाही. तसेच हे सारे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येत असल्याचा आरोप माजी सभापती नरेंद्र पाटील यांनी केला आहे. 

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

हा तर राजकारणाचा भाग -
या पार्श्वभूमीवर वसई विरारच्या आयुक्तांना मिळालेले अभय हा राजकारणाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहेत. आता पालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या दोन हजाराच्यावर गेली असताना एका आयुक्ताला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा हे कसे काय असा सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारला आहे.

Mira-Bhayander Municipal Commissioner Chandrakant Dange's transfer, but 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mira-Bhayander Municipal Commissioner Chandrakant Dange's transfer, but