कामावर या, अन्यथा बडतर्फी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांचा इशारा

मिरा रोड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असतानाही काही कर्मचारी व अधिकारी कामावर येत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अशा सर्वांनी तातडीने कामावर हजर व्हावे, अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिला.

सोशल व्हायरसपासून दूर रहा

मिरा-भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आयुक्त डांगे दिवसभर विविध विभाग रुग्णालयांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत असतानाच काही अधिकारी कामावर येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेकडे कर्मचारी व अधिकाऱ्यांची सध्या कमतरता जाणवत आहे.

संपत्तीपेक्षा आई-वडिलांचा सन्मान अधिक महत्त्वाचा : न्यायालय

शहरावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आयुक्त डांगे यांनी 27 मार्च रोजी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक सुट्ट्या रद्द करून त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश जारी केले होते; मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवल्याचे दिसून येते. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विभागप्रमुखांना अधिकार 
दरम्यान, आवश्‍यक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याचे सर्व अधिकार आयुक्तांनी विभागप्रमुख व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर करावा, असा सक्त आदेश आयुक्तांनी दिला आहे. 

Mira-Bhayander Municipal Commissioner's warning


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mira-Bhayander Municipal Commissioner's warning