

Mira Bhayander Municipality Transport Service
ESakal
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेची सध्या अवस्था खिळखिळी झाली आहे. सेवेत असलेल्या व डिझेलवर चालणाऱ्या बसपैकी तब्बल ४० टक्के गाड्या देखभाल-दुरुस्तीअभावी आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांची सर्वाधिक संख्या असलेल्या मार्गावर बस कमी धावत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.