डोक्यावर कर्जाचं डोंगर असतानाही रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा

डोक्यावर कर्जाचं डोंगर असतानाही रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा

मुंबई: मुंबईतल्या एका रिक्षा चालकाने विसरलेल्या प्रवाशांचे तब्बल 14 लाख किंमतीचं सोनं आणि पैसे परत केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा रिक्षा चालक देखील आर्थिक अडचणींत आहे.  त्यांच्या ऑटो रिक्षाच्या कर्जाचे हफ्ते थकले आहेत. मात्र असं असतानाही रिक्षामध्ये विसरलेले पैसे परत केले आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. इफ्तिकार शेख असं या ऑटो रिक्षा चालकाचं नाव आहे. हे रिक्षा चालक मिरा रोड येथे राहतात. इफ्तिकार शेख यांनी रविवारी नाझीन शेख या पॅसेंजरला मुंबईतल्या कश्मिरा भागात सोडलं. नाझीन हे तिथून बसने गुजरातला जाणार होते. नाझीन यांना सोडल्यानंतर रिक्षा चालकानं आणखी काही पॅसेंजर्सना त्यांच्या इच्छित स्थळी सोडलं. घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑटो रिक्षा स्वच्छ करत असताना गाडीत सापडलेली बॅग पाहून त्यांना धक्का बसला. 

इफ्तिकार यांच्या रिक्षात सापडलेल्या बॅगमध्ये पैसे आणि सोनं होतं. पैसे बघितल्यानंतर इफ्तिकार यांनी थेट कश्मिरा पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना ती बॅग परत केली. मात्र ती बॅग नेमकी कोणाची आहे, याची खात्री त्यांना मात्र देता येत नव्हती. पोलिसांनी ती बॅग उघडून त्याची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना बॅगेमध्ये नाझीन यांचा मोबाईल नंबर मिळाला. 

बॅग हरवल्यानंतर नाझीन यांनी गुजरातला जाणं रद्द केलं होतं. नाझीनही त्या रात्री ऑटो रिक्षाचा शोध घेतला मात्र पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली नव्हती. पोलिसांनी बॅग त्यांचीच असल्याची खात्री केली आणि त्यांना ती बॅग परत केली. या बॅगमध्ये एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

डोक्यावर कर्जाचं डोंगर 

ऑटो रिक्षासाठी इफ्तिकार यांनी लोन घेतलं आहे. लॉकडाऊनमुळे इफ्तिकार आर्थिक अडचणीत सापडले. रिक्षाचे मासिक हप्ते ऑक्टोबरपासून थकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सध्या ते जास्त वेळ काम करत असल्याचं इफ्तिकार यांनी सांगितलं. 

Mira Road auto rickshaw driver return bag with 14 lakh cash and gold

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com