मिरज-दादर विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - उन्हाळी सुटीसाठी मध्य रेल्वेने मिरज ते दादर टर्मिनसपर्यंत विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01206 मिरज-दादर विशेष गाडी मिरजहून सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता दादर स्थानकात पोचेल. सांगली, किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, सातारा, पुणे, लोणावळा आणि कल्याण स्थानकांत या गाडीला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर कोच व दोन द्वितीय श्रेणीचे सर्वसामान्य कोच असतील.

"आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर आणि रेल्वेच्या अधिकृत तिकीट विक्रीधारकांकडे 20 एप्रिलपासून या गाडीचे आरक्षण करता येणार आहे.

Web Title: miraj dadar special railway