पॉर्न पाहून मुलीशी अश्लील चाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई : पॉर्न फिल्म पाहून सावत्र मुलीसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या पित्याला नुकतीच डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंगासह, पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 

पीडित मुलगी ही अंधेरी परिसरात राहते. तिची आई एका गुन्ह्यात अटक झाल्यामुळे ती सध्या तुरुंगात आहे. याचाच फायदा आरोपीने घेतला. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तो पॉर्न फिल्म पाहत असे. फिल्म पाहिल्यानंतर तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करत असे. दारूच्या नशेत असताना तो मुलीला धमकावत तिच्याकडून अश्‍लील कृत्य करत असायचा. भीतीपोटी पीडित मुलगी हा त्रास गेल्या काही महिन्यांपासून सहन करत होती. तीन दिवसांपूर्वी मुलीचे एक नातेवाईक घरी आले. तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्याने घडल्या प्रकाराची माहिती डी. एन. नगर पोलिसांना कळवली.

पोलिसांनी मुलीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने अश्‍लील कृत्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी मुलीच्या पित्याविरोधात विनयभंग आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Web Title: misbehave with daughter by step father after seeing porn