बेपत्ता वृद्धाचा सहा तासांत शोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - फिरण्यासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या वृद्धाला "पांडे मॉड्यूल'मुळे अवघ्या सहा तासांत पोलिसांनी शोधून काढले. त्याबद्दल या वृद्धाच्या कुटुंबीयांनी मुंबई आणि नाशिकमधील पंचवटी पोलिसांचे कौतुक केले आहे.

मूळचे राजस्थानमधील रहिवासी असलेले गिरीधर (बदललेले नाव) पाच दिवसांपूर्वी मुंबईत राहण्यासाठी आले होते. ते दररोज सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडायचे. शुक्रवारी पहाटेच फिरण्यासाठी गेलेले गिरीधर दुपारपर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. ते सतत गिरीधर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शनिवारी (ता. 15) अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ता व्यक्तींना शोधून काढण्याबाबत प्रसिद्ध असलेले हवालदार राजेश पांडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी गिरीधर यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून घेतलेल्या गिरीधर यांच्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी पांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. काही मिनिटांतच ही माहिती पांडे यांना देण्यात आली. त्यावरून गिरीधर नाशिकमधील पंचवटी येथे असल्याचे समजले.

Web Title: Missing Old Man Searching Police