किल्ल्यावर भरकटलेल्या तरुणांना शोधण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नेरळ : कर्जत तालुक्‍यात पर्यटकांना पाणवठा, तलाव, धरणे आणि गड-किल्ल्यांवर जाण्यास बंदी आहे. जमावबंदी लागू असताना ट्रेकिंगसाठी गेलेल्या नऊ पर्यटकांना काळोखात शोधण्याची वेळ नेरळ पोलिसांवर आली. पेब किल्ल्यावर भरकटलेल्या ट्रेकर्सना शोधण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे. 

माथेरानच्या डोंगर रांगेतील या किल्ल्यावर ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येतात. गवतामुळे पायवाटा दिसत नसल्यामुळे नव्याने आलेले ट्रेकर्स रस्ता चुकतात. यंदा पावसाळ्यात चौथ्यांदा ट्रेकर्स चुकल्याची घटना घडली आहे. 22 ऑगस्टला मुंबईतील दोन ट्रेकर्स पेब किल्ल्यावर रस्ता भरकटले होते. त्यांना नेरळ पोलिसांनी सायंकाळी 6.30 वाजता शोधले. त्यानंतर 24 ऑगस्टला नऊ ट्रेकर्स रस्ता भरकटले. 4 वाजता फोन आल्यानंतर प्रभारी पोलिस अधिकारी सोमनाथ जाधव पोलिस पथकासह 6.30 वाजता पेब किल्ल्यावर पोहचले. पोलिसांनी रात्री ट्रेकर्सना शोधले. युवराज ताजणे, प्रशांत पाटील, सिद्धार्थ मांडवकर, नीरज नाईक, अपूर्व कीर, सात्विक शिंदे, प्रणव कीर, साहिल भोसले, श्रेयस मोहिते यांचा शोध लागल्यानंतर त्यांना घेऊन पोलिस रात्री 10 वाजता नेरळ पोलिस ठाण्यात पोहचले. 

जमावबंदी आदेश कशासाठी? 

कर्जत तालुक्‍याच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी पावसाळ्यात तालुक्‍यातील पाणवठे, तलाव, धरणे आणि गडकिल्ले या ठिकाणी जाण्यास बंदी घातली होती; मात्र तालुक्‍यात शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भिजण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी येत आहेत. मग प्रशासनाचा जमावबंदी आदेश काय करतो, हा प्रश्‍न कायम आहे. 

Web Title: Missing Youth Found on Fort