ठाण्यापाठोपाठ पनवेल महापालिकेचा मोठा निर्णय, आजपासून 'या' सुविधा सुरु

ठाण्यापाठोपाठ पनवेल महापालिकेचा मोठा निर्णय, आजपासून 'या' सुविधा सुरु

मुंबईः ठाणे महानगरपालिकेनंतर पनवेल महानगरपालिकेनं देखील आजपासून सर्व दुकानं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या निर्णयानंतर पनवलेमध्ये आजपासून सुरु दुकानं सुरु झाली आहेत. पालिकेनं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्याची मुभा दिलीय. नवी मुंबई पालिकेनं या आदेशाद्वारेच दुकानं सर्व दिवस खुली ठेवण्यास परवानगी दिली. 

पीएमसीच्या हद्दीत कामोठे, खारघर, कळंबोली आणि पनवेल शहर आहे. शहरातील 
रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे हे लक्षात घेऊनच आणि नागरिकांकडून सातत्यानं अपील केल्यामुळे, सर्व दुकानं पुन्हा सुरु  करणं योग्य असल्याचं पीएमसी आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले. त्यामुळे आम्ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत दुकानांना कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आदेशानुसार मॉल्स, बाजारपेठ, जिम आणि स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दुकानांनाही निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. 

पनवेलमध्ये नव्या रुग्णांची भर 

शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या हद्दीत शुक्रवारी १३० नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर ११ मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ९ रूग्णांचा यापूर्वीच झाला आहे. मृतांमध्ये खांदा कॉलनीतील ३, खारघरमधील ३, कामोठ्यातील २ तसेच नवीन पनवेलमधील, पनवेल आणि धरणा कँप येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १२२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८९०३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७१७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १५०४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. तर शहराचा रिकव्हरी रेट ८०.७३ टक्के आहे. 

ठाण्यातही आजपासून दुकानं सुरु 

आजपासून ठाण्यातील सर्व दुकानं सुरु झाली आहेत. आजपासून सर्व दुकानं सुरु ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेनं परवानगी दिली आहे.  ही सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली असतील. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.  ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते, ती आजपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. 

दरम्यान मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेण्यात येणार आहे.  त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. तसंच सिनेमागृहे अजून काही काळ बंद असणार आहेत.

Mission Begin Again Panvel Municipal Corporation Lets all shops Reopen From Today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com