मिठीच्या रुंदीकरणासाठी अजून 569 कोटी, रुंदीकरणाचा खर्च 2 हजार कोटी पार

समीर सुर्वे
Thursday, 26 November 2020

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाच्या कामासाठी 13 वर्षात 1 हजार 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत

मुंबई, ता. 26 : मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाच्या कामासाठी 13 वर्षात 1 हजार 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, अद्याप हे काम पुर्ण झालेले नाही. आता काही भागातील नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी महानगर पालिका 569 कोटी 52 लाख रुपये खर्च करणार आहे. पुढील दोन वर्षात हे काम पुर्ण होणार आहे. या प्रस्तावांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र,यात नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण किती होणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

काय सांगता ? शिवसेना आणि भाजप आलेत एकत्र आणि प्रस्तावही झाला मान्य, काँग्रेसचा सभात्याग; कोणता होता हा प्रस्ताव?

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम टप्प्या टप्प्यांमध्ये सुरु आहे. हे रुंदीकरणाचे कामही चार टप्प्यांमध्ये होत आहे. यात, विनामतळ टॅक्सी-वे पुल, कुर्ला ते अशोक नगर अंधेरी पुर्व किनारा, विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर पश्‍चिम किनारा, वांद्रे कुर्ला संकुल एमटीएनएल ते विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला, अशोक नगर अंधेरी ते पवई फिल्टरपाडा या टप्प्यांमध्ये काम होणार आहे. महापालिकेने हे प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात बैठकीत मांडले होते. मात्र, स्थायी समितीने तेव्हा हे प्रस्ताव फेटाळले होते. बुधवारी झालेल्या बैठकीत पुन्हा प्रशासनाकडून हे प्रस्ताव मांडण्यात आले. या सर्व प्रस्तावात स्थायी समितीत मंजूरी देण्यात आली. महानगर पालिकेने केलेल्या अंदाजित खर्चापेक्षा कंत्राटदारांनी 20 ते 30 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. मात्र,कामासाठी यंत्रसामुग्री नेण्यासाठी रस्ता तयार करावा लागणार आहे. तसेच, नदीतून काढलेल्या दगड मातीचे व्हिलेवाट कंत्राटदाराला स्वत:ला लावायची आहे. नदीच्या किनाऱ्यावर अतिक्रमण असल्याने काम विलंबाने सुरु होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंत्राटदारांनी वाढीव दर दिल्याचे प्रशासनाकडून प्रस्तावात नमुद करण्यात आले. मात्र, कंत्राटदारांनी वाटाघाटी केल्यानंतर कंत्राटदार 18 ते 22 टक्के कमी दराने करण्यास तयार झाले आहे.

महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

असा वाढला खर्च

  • विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर अंधेर (पुर्व किनारा) : पालिकेचा  अंदाजित खर्च ६३ कोटी ४३ लाख ३५ हजार ४६६, प्रत्यक्ष खर्च 75 कोटी 80 लाख 30 हजार 881
  • विमनातळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर अंधेरी (पश्‍चिम किनारा ) : पालिकेचा अंदाजित खर्च 71 कोटी 17 लाख 00 हजार 474, प्रत्यक्ष खर्च 96 कोटी 95 लाख 49 हजार 556
  • एमटीएनएल  बीकेसी ते विमानतळ टॅक्सीवे पुल कुर्ला : पालिकेचा अंदाजित खर्च 113 कोटी 18 लाख 23 हजार 685, प्रत्यक्ष खर्च 138 कोटी 95 लाख 39 हजार 939  
  •  अशोक नगर अंधेरी ते फिल्टरपाडा पवई : पालिकेचा अंदाजित खर्च 97 कोटी 60 लाख 04 हजार,  198 प्रत्यक्ष खर्च 131कोटी 54 लाख 79 हजार 930

महत्त्वाची बातमी  : नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

10 लाखाचा दंड

मिठी नदीचे प्रदुषण रोखण्यात महानगर पालिकेला अपयश आलेले असल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने महापालिकेला दर महिन्याला 10 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे काम नियोजीत वेळेत पुर्ण करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये नमुद केले आहे. यात नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याबरोबरच नदीत येणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. तसेच, मैला आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या बाजुने वाहीनी तयार करण्यात येणार आहे. 

mithi river deepening and widening expenses crossed two thousand crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mithi river deepening and widening expenses crossed two thousand crore