'मिठी'तील अवैध बांधकामे काढावीत - रामदास कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविणे; तसेच अधिकृत बांधकामातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असा आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारीा दिला.

कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिठी नदी व मुंबईतील इतर नद्यांच्या प्रदूषणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कदम यांनी या वेळी मिठी नदीबाबत झालेल्या कामांचा आढावा घेतला व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Mithi river illegal construction remove