भेसळयुक्त दुधाची उरणमध्ये विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

उरण - येथील एका डेअरीमधून भेसळयुक्त दुधाची विक्री करण्यात आल्याची तक्रार एका ग्राहकाने पोलिसांकडे केली. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांना छापा टाकून दुधाचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

येथील डेअरीतून रविवारी वैभव भगत यांनी रसमलाई बनविण्याकरिता गाईचे दूध खरेदी केले. साधारणतः दुधात लिंबू पिळल्यानंतर दूध फुटले जाते; मात्र भगत यांनी खरेदी केलेले दूध उकळल्यानंतर लिंबू टाकल्यानंतरही फुटले नाही. तसेच या दुधावर साय तयार होत नव्हती. या दुधाला पाण्यासारखीच उकळी येत होती. त्यानंतर भगत यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर "एफडीए'ने दुधाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.

Web Title: mixing milk sailing in uran