आमदार करतोय भर पावसात अन्नत्याग आंदोलन (व्हिडिओ)

आमदार करतोय भर पावसात अन्नत्याग आंदोलन (व्हिडिओ)

मुंबई - अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारविरुद्ध एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच चक्क पडत्या पावसात कडूंनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मतदारसंघातील समस्यांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कडू यांनी हे एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे.

विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा आहे. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीनंतरच नव्या सरकारसह पहिले अधिवेशन होणार आहे. त्यामुळे, सरकारकडून आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन सरू केले आहे. आपल्या मतदारसंघात 200 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे, पण अद्याप त्यासाठी निधी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचेही भूमिपूजन झाले, पण त्यालाही निधी दिला नाही. अचलपूर जिल्हा निर्मित्तीचाही प्रश्न महत्त्वाचं आहे. वासनी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची अधिसूचना सरकारने काढावी. राजुरा येथील घरांना 15 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालय, कृषीमहाविद्यालय अन् 14 गावच्या पाणीप्रश्नासंदर्भातील प्रश्नांसाठी मी अन्नत्याग आंदोलन करत आहे. आमदारावर अन्नत्याग आंदोलनाची वेळ येत असेल तर, ही खेदाची बाब आहे. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या सरकारने आमच्याकडेही लक्ष दिले पाहिजे. सुनलो हमारी बात.. असा बोर्ड अंगावर लटकावत, आम्ही वारंवार सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने गंभीर असलं पाहिजे, असेही आमदार बच्चू कडू यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com