Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा खंदा समर्थक विकी गणात्रा अटकेत

भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात भाजप कार्यकर्ते विकी गणात्रा याला एटक करण्यात आली आहे. विकी हा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा खंदा समर्थक तथा आमदार गायकवाड यांचा निकटवर्तीय आहे.
mla gaikwad shooting case kapil patil supporter viki ganatra arrested
mla gaikwad shooting case kapil patil supporter viki ganatra arrestedSakal

डोंबिवली - भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात भाजप कार्यकर्ते विकी गणात्रा याला एटक करण्यात आली आहे. विकी हा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा खंदा समर्थक तथा आमदार गायकवाड यांचा निकटवर्तीय आहे.

आमदार गायकवाड यांसह सहा जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात विकीचा देखील समावेश आहे. या घटनेतील दोन जणांचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी संदिप सरवणकर, हर्षल केणे यांना याआधी अटक केली आहे. तर आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा आणि नागेश बडेकर यांचा पोलिस शोध घेत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकी याने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे आत्मसमर्पण केले आहे.

विकी हा कल्याणमध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणून सक्रीय आहे. त्याच्या भावाकडे भाजपचे पद देखील आहे. पक्षाच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यकम्रात विकी याची उपस्थिती होती. विकी हा केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि भाजप आमदार गायकवाड यांचा निकटवर्तीय आहे. गोळीबाराच्या घटनेच्या वेळी विकी हा आमदार गायकवाड यांच्याशी बोलण्याकरीता आला होता अशी माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com