साक्रीतील घटना पुन्हा घडू नये म्हणून आमदार गोऱ्हे यांनी सुचवल्या उपाययोजना

संजय शिंदे
बुधवार, 11 जुलै 2018

सभागृहामध्ये बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या. 

मुंबई - धुळे - साक्री येथील घडलेल्या घटना पुन्हा घडू नये म्हणून टास्क फोर्स किंवा आयोग नेमावा, पावसाळी अधिवेशनामध्ये ९७ अन्वये चर्चेमध्ये आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मागणी केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पाच लोक किडनी चोरण्यासाठी आणि मुले पळविण्यासाठी आलेले आहेत. अशा अफवामुळे त्या भागात नाथपंथी डवरी समाजातील ५ निष्पाप लोकांना जमावाने ठार मारले. याच प्रकारच्या अफवा आणि घटना मालेगाव, परभणी, लातूर, संभाजीनगर या भागात पूर्वी झालेल्या आहेत. तसेच देशातील झारखंड, बिहार, ईशान्य भारतातील भागात असे आतापर्यंत एकूण २२ लोकांचे बळी गेले आहेत. याविषयी सभागृहामध्ये बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या. 

  • संवेदनशील आणि समाजात तिढा निर्माण करणाऱ्या अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवाव्यात.
  • बाळकृष्ण रेणके यांनी भटक्या जमाती बाबत अहवाल मांडला आहे त्याचा आधार घेऊन या समाजाला न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करुन टास्क फोर्स किंवा एखादा आयोग नेमावा.
  • भटक्या समाजातील लोकांचे प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये पुनर्वसन करावे व त्यासाठी विशेष योजना, तसेच निधीची तरतूद करावी.
  • व्हॉट्सअपवर येणाऱ्या अफवांवर पायबंद घालण्यासाठी, अफवांची अफवा करणाऱ्या समाजकंटकांना गृहराज्यमंत्री यांनी, ज्यांनी तो मेसेज ज्यांनी मूळ पाठवला असेल त्याला शिक्षा करावी, त्यासाठी कायदा करावा.
  • मानवी तस्करी, किडन्या चोरणाऱ्या टोळ्या असा कुणा बाबत संशय आल्यास त्यांना मारून कायदा हातात न घेता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तरच समाजातील भीती कमी होईल, तरच या परिघावरील समाजाला न्याय मिळेल.

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MLA Gorhe suggested for the solution so that the incident did not happen again like Sakri