
डोंबिवली : कल्याण जिल्हा स्वतंत्र व्हावा ही आमची पहिल्यापासून ची मागणी आहे. आता जनगणना आता सुरू होईल, त्यानंतर कल्याण जिल्हा शंभर टक्के स्वतंत्र होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिला आहे. जोपर्यंत जिल्हा स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असे वक्तव्य आमदार किसन कथोरे यांनी कल्याण येथे केले.