बापरे ! ...म्हणून त्याने मित्राला चौथ्या मजल्यावरून दिलं फेकून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

मुंबई - मित्राने केलेली मस्करी सहन न झाल्याने एका माथेफिरू तरुणाने आपल्याच मित्राला चौथ्या मजल्यावरून फेकल्याचा खळबळजनक प्रकार कुरार परिसरात घडला आहे. चौथ्या मजल्यावरून पडल्याने डोक्‍याला गंभीर मार लागलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत मित्राला अटक केली.अभिषेक चौहान (28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अभिषेकला ढकलणाऱ्या अविचंद्र यादव (24) याला अटक केली आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती...

नक्की झालं काय होतं ?  

कुरारच्या पठाणवाडीमध्ये शीतल तपोवन इमारतीचे काम सुरू असून अभिषेक आणि अविचंद्र दोघेही तिथे काम करीत होते. रात्री अभिषेक याने मोबाईलच्या बॅटरीचा लाईट अविचंद्र याच्या डोळ्यावर मारला. डोळ्यांना त्रास होत असल्याने लाईट मारू नकोस, असे अविचंद्र वारंवार सांगत होता. तरीही अभिषेक ऐकत नसल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले आणि त्यातूनच संतापलेल्या अविचंद्र याने अभिषेकला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. 

मोठी बातमी -  "'आई टीचर मला मारते" ; आईने मुलीचा हात पहिला तर होत्या...

गंभीर मार लागल्याने मृत्यू

अभिषेक लिफ्टच्या डक्‍टमध्ये कोसळला. उंचावरून पडल्याने डोक्‍याला गंभीर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे अचानक झालेल्या वादातून असा प्रकार घडला असल्याची शक्‍यता आरोपी व मृत तरुणाला ओळखणाऱ्यांनी व्यक्त केली. वैभव शंकर गोरड यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी कुरार पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत अभिषेक उत्तर प्रदेशातील सरपरा येथील रहिवासी आहे.

friend pushed friend from forth floor just because being teased by mobile torch

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend pushed friend from forth floor just because being teased by mobile torch