Raju Patil : शिवरायांची ‘राजसदर’ पुनर्निर्मिती करावी.... ; मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारचे टोचले कान

शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची चढाओढ बाजूला ठेवा ; मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारचे टोचले कान
raju patil
raju patilsakal

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज सर्वत्र जयंती साजरी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारचे कान टोचले आहेत. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक प्रस्तावित आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे जलपूजन झाल्यानंतर पुढे काही फारशा हालचाली दिसून येत नाही. अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेपेक्षा शिवरायांचा किती भव्य पुतळा उभारायचा ही वृथा चढाओढ बाजूला ठेवा. रायगडावर शिवरायांची 'राजसदर' पुनर्निर्मिती करावी अशी तमाम शिवप्रेमींची मागणी सरकारने पूर्ण करावी असे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती सर्वत्र साजरी होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट सर्वांचे लक्ष वेधत आहे. ट्विटमध्ये किल्ले रायगडाचा सध्याच्या फोटो आणि त्याचे संवर्धन केल्याने तेथे राजसदरची पुनर्निर्मिती केल्यानंतर हा किल्ला कसा दिसेल असे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबतच त्यांनी मजकूर लिहित सरकारचे कान टोचले आहेत. मुंबईत अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक उभे केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाच्या कामाचे जलपूजन देखील झाले आहे. मात्र त्यावर पुढे काहीच हालचाली होताना दिसत नाही असे म्हणत सरकारचे कान आपल्या शैलीत टोचले आहेत. यावरुन आमदार पाटील यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाबाबत मोदींच्या हस्ते तथाकथित जलपूजन झाल्यानंतर आजतागायत काहीच हालचाल होताना दिसत नाहीये. खरंतर अमेरिकन स्वातंत्र्यदेवते पेक्षा शिवरायांचा किती भव्य पुतळा उभारायचे ही वृथा चढाओढ बाजूला ठेवायला हवी. शिवरायांचे सर्व गडकिल्ले हीच त्यांचे जिवंत स्मारकं आहेत व त्यांचेच संवर्धन व्हावे ही राज ठाकरे यांच्या सोबतच अनेक शिवप्रेमींची पण इच्छा आहे, भूमिका आहे.

raju patil
Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत दिले मोलाचे योगदान

आज छत्रपती शिवप्रभूंची तारखेनुसार जयंती आहे. सध्या अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर असो की देशातल्या अनेक देव दैवतांचे मंदिर वा स्मारक असो त्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र ज्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत अनेकदा आपल्या प्राणांची बाजी लावून देव, देश आणि धर्माचे रक्षण केले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गराज रायगडासाठी तरी किमान पुरातत्व खात्याचे नियम अपवाद करून तिथे छत्रपती शिवरायांची ‘राजसदर’ पुनर्निर्मिती करावी जेणेकरून शिवभक्तांना शिवकालीन रायगडरूपी शिवस्मारकाचा अर्थात किल्ले रायगड अनुभवता येईल व संपूर्ण जगाला आपल्या इतिहासाचा हेवा वाटेल ही तमाम शिवप्रेमींची मागणी सरकारने पूर्ण करावी. असे म्हणत हे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राज्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना टॅग केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com