आमदार रवींद्र पाटील यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पेण : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह पेण तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. या वेळी युवानेते वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे, वडखळचे सरपंच राजू मोकल, वढावच्या सरपंच पूजा अशोक पाटील, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, गटविकास अधिकारी पी. एम. पाटील, तालुका कृषी अधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्‍याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे पेण तालुक्‍यातील चार हजार ८६३ हेक्‍टर भातशेती पूर्णपणे नामशेष झाली आहे. वाशी, वाढाव, कलेश्री, भाल या खारेपाट विभागातील तसेच हमरापूर, तांबडशेत, सोनखार, उरणोली, कळवे या भागातील भातशेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त वाशी खारेपाट व हमरापूर विभागात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. परतीच्या पावसाने भातशेती भिजून भाताच्या रोपांना पुन्हा कोंब फुटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश या वेळी त्यांनी प्रशासनाला दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ravindra Patil inspects the affected areas