Rohit Pawar
ESakal
मुंबई
Maharashtra Politics: नवी मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव! भूखंड वाटपप्रकरणी रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar: बिवलकर भूखंड वाटप प्रकरणात पुरावे देऊनही बिवलकरसह इतरांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याने आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत नवी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे.
नवी मुंबई : बिवलकर भूखंड वाटप प्रकरणात पुरावे देऊनही जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कारवाई करीत नसतील तर राज्यात भ्रष्टाचार आणखी फोफवल्याशिवाय राहणार नाही. शासनाचे १,४०० कोटींचे नुकसान केल्याबाबत वन अधिकाऱ्याने तक्रार करूनही बिवलकरसह इतरांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करीत नवी मुंबई पोलिसांवर सरकारद्वारा दबाव असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

