बालेकिल्ले राखणारच  - सुभाष भोईर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, कौसा तलाव हे प्रभाग शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. ते राखणारच, असा विश्‍वास आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला. देसाई येथील शिवसेना शाखेत निवडणूक प्रचाराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

देसाई गावातील शिवसैनिकांनी उपमहापौर सीताराम भोईर यांच्या रूपाने निवडून दिला. त्यानंतर ते आमदारही झाले. यामुळे शिवसेना या विभागातील घराघरांत पोहचली. प्रतिमा मलीन करणारी चित्रफीत प्रसारित करून या स्थितीत काहीच फरक पडणार नाही. शिवसेना विकासाच्या आधारावर निवडणूक लढवत आहे. या वेळी शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. रमेश पाटील यांच्या हस्ते देसाई शाखेमध्ये व विभागप्रमुख चंदू अलीमकर यांनी शिळ येथे प्रचाराचा नारळ वाढवला. त्या वेळी या विभागात पालकमंत्री शिवसेनेचा, खासदार शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे त्यामुळे नगरसेवकही शिवसेनेचाच निवडून द्यावा लागेल, असे आवाहन रमेश पाटील यांनी केले. 

कार्यक्रमाला माजी आमदार सीताराम भोईर, सुमित भोईर, कीर्ती पाटील, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, विभागप्रमुख गणेश जेपाल, सुनील अलीमकर, नेताजी पाटील, उपविभागप्रमुख विष्णू कोटकर, शाखाप्रमुख वैकुंठ म्हात्रे, वासुदेव पाटील, पंढरी पाटील, नवनाथ पाटील, मधुकर पाटील, हरेश पाटील, सतीश पाटील, अशोक म्हात्रे, तुकाराम पाटील, गुगील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MLA Subhash Bhoir