विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होणार? फडणवीसांनी बोलावली भाजपा नगरसेवकांची बैठक | Devendra fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

विधान परिषद निवडणुकीत दगाफटका? फडणवीसांनी बोलावली भाजपा नगरसेवकांची बैठक

- सुशांत सावंत

मुंबई: विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Mlc election) पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आज मुंबईतल्या भाजपा नगरसेवकांची (Bjp corporator) बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर (Suresh Koparkar) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोन जागांसाठीची ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर भाजप अलर्टवर आहे. निवडणूक झाल्यास दगाफटका होवू नये म्हणून भाजपकडून आतापासूनच काळजी घेतली जात आहे. भाजपनं विधान परिषदेसाठी राजहंस सिंह हा उत्तर भारतीय उमेदवार दिल्यानं भाजपचे मराठी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाकडून आधीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा: ऐकीव माहितीवर अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले - परमबीर सिंग

शिवसेनेकडून सुनील शिंदे यांना तर भाजपाकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षीय बलाबल लक्षात घेता, या दोन्ही जागा सहज निवडून येतील. पण काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिला नाही. कोपरकर यांची भिस्त नाराज नगरसेवकांवरच असेल. त्यामुळे भाजपा आतापासूनच काळजी घेत आहे. या बैठकीत पालिका निवडणूक तयारीचाही आढावा घेतला जाईल.

loading image
go to top