esakal | वरळीवरुन थेट गाठता येणार शिवडी न्हावा शेवा! मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीवरुन थेट गाठता येणार शिवडी न्हावा शेवा! मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प

वरळीवरुन थेट शिवडी न्हावा शेवा मार्गला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार आहे.

वरळीवरुन थेट गाठता येणार शिवडी न्हावा शेवा! मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : वरळीवरुन थेट शिवडी न्हावा शेवा मार्गला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार आहे. मात्र, हा मार्ग गिरणगावच्या भरवस्तीतून जाणार असल्याने प्रकल्पग्रस्तांचा पेच मोठा आहे. या प्रकल्पग्रस्तांचे त्याच परीसरात पुनर्वसन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थीतीत बैठक पार पडली.

वांद्रे वरळी सागरी सेतूवरुन थेट शिवडी न्हावा शेवा मार्गावर जाता यावे म्हणून वरळी, प्रभादेवी, परळ, भोईवाडा या परीसरातून नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. हा 4.5 किलोमिटरचा प्रकल्प असून त्यासाठी 1200 कोटी रुपयांपर्यतचा खर्च येणार आहे. हा मार्ग दाट वस्तीचा असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Powerat80 : डॉक्टरांनी सांगितलं होतं, "तुमच्याकडे केवळ ६ महिने शिल्लक आहेत"; यावर शरद पवार म्हणाले होते...

या बैठकीला आदित्य ठाकरे, आमदार अजय चौधरी, सदा सरवणकर, माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, पालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, संजय दराडे उपस्थित होते. 

आढावा बैठकीत प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या कुटूंबाच्या  पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचे त्याच परिसरात कशा पद्धतीने चांगल्या रितीने पुनर्वसन करता येईल याबाबत  चर्चा झाली. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल, असे  ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

MMR to undertake sewri worli connector project now travelling from worli to navha shiva is easy 

loading image