

Mumbai Metro Travel Pass Concession
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : आरे-नरिमन पॉईंट दरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रो मार्गावर आता विद्यार्थी आणि पर्यटकांना सवलतीच्या दरात पास मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) ने विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. 'डिजिटल मोबिलिटी'ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.