मुंबईकरांनो, तयार आहात का तुम्ही? तुमच्या सेवेत पुन्हा येत आहे 'ही' सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून मुंबईसह देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून मुंबईसह देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हांतर्गत एसटी सुरु केली आहे. मुंबईतही सरकारने हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्य सरकारने आदेश दिल्यास कुठल्याही क्षणी मेट्रो आणि मोनोरेलची सेवा सुरू करण्यास तयार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए )आणि मेट्रो वनच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

मोठी बातमी मॉलमधील दुकानदाराने केली न्यायालयाकडे चक्क 'ही' मागणी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण... 

लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजानिक वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासची मुभा देण्यात आली आहे.  मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली.  मात्र आता मेट्रो प्रशासनाने कोरोनापश्चात सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना सुरक्षितचे नियम पाळता यावेत यासाठी स्थानकांत आणि प्रवासी डब्यांमध्ये स्टीकर्स लावण्यात आले आहे. या स्टिकर्सच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये साधारण दीड मीटर अंतर राहील, अशा जागा तयार करण्यात येत आहेत. 

मोठी बातमी ः मंत्री अशोक चव्हाण यांचे १४ दिवसानंतरचे कोरोना रिपोर्ट आलेत, आता पुढील १४ दिवस...

संचारबंदीत शिथिलता आणल्यानंतर लवकरच या सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्ये स्टीकर्स मेट्रो मध्ये लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना कुठे बसावे व बसू नये हे कळणार आहे. ट्रेनमध्ये चढताना वा उतरताना सुरक्षित वावर राखण्यासाठी ठराविक जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. तसेच पावसाचा विचार करता सिग्नल यंत्रणा व सर्व तांत्रिक उपकरणांची देखभाल-दुरुस्ती केली असून मोनोरेलच्या मार्गिकेत येणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mmrcl and metro one are ready to resume their service soon