
लॉकडाऊनला जवळपास अडीच महिने होत आले असून केंद्रासह राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळत आहे. मात्र, सुधारित नियमावली नुसार राज्यातील मॉल, चित्रपटगृहांना अद्यापही बंदी कायम आहे.
मुंबई : लॉकडाऊनला जवळपास अडीच महिने होत आले असून केंद्रासह राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळत आहे. मात्र, सुधारित नियमावली नुसार राज्यातील मॉल, चित्रपटगृहांना अद्यापही बंदी कायम आहे. दुसरीकडे सरकारने महसुलवाढीसाठी मद्याची होम डिलिव्हरी सुरु केली. त्यानुसार मद्याची ऑनलाईन विक्री करून त्याची होम डिलिव्हरी सुरु झाली.
मोठी बातमी - जितेंद्र आव्हाडांनी थेट नरेंद्र मोदींकडे केली 'ही' मागणी...
राज्यातील मॉल सुरु करण्यास सध्यातरी मनाई असली तरी मॉलमध्ये असलेल्या वाईन शॉपना देखील होम डिलिव्हरी मार्फत मद्यविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मोठी बातमी ः विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात नवा ट्विस्ट, प्रत्यार्पणाची बातमी अफवा
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या सीआर-2 मॉलमध्ये एक मद्याचे दुकान आहे. हे दुकान मॉलमध्ये असले तरी त्याला येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. त्यामुळे मॉल बंद ठेवूनही ऑनलाईन पद्धतीने होम डिलिव्हरीद्वारे मद्यविक्री करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी दुकानमालकाने केली आहे. त्यांनी एकल दुकान या गटात हे दुकान येते, असा दावा केला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने ही मागणी अमान्य केली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
मोठी बातमी ः मंत्री अशोक चव्हाण यांचे १४ दिवसानंतरचे कोरोना रिपोर्ट आलेत, आता पुढील १४ दिवस...
न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये याचिकेवर सुनावणी झाली. महापालिका आणि राज्य सरकारने याबाबत बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. 5) रोजी निश्चित केली.