
मुंबई : भुयारी मेट्रो-३ मार्गावरील प्रवाशांची आता तिकिट खिडकीवर तिकीट काढून प्रवास करण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. एमएमआरसीएलने आज नॅशनल काॅमन माॅबिलिटी कार्डचे (एनसीएमसी) अनावरण केले असून ते उद्या बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाशिवाय केवळ कार्ड मशीनवर टॅप करून प्रवास करता येणार आहे.