

Thakurli Flyover Work
ESakal
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकादरम्यान रखडलेल्या उन्नत मार्ग प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जागा हस्तांतरण, बाधितांना मोबदला व पुनर्वसन अशा अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला आहे. आता एमएमआरडीएकडून ३६ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च ६०.५३ कोटी रुपये असूनस पहिल्या टप्प्यातील निधी प्रक्रिया मार्गी लागली आहे.