Thane to Mumbai Eastern Freeway Project
ESakal
मुंबई
Mumbai: ठाणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ 25–30 मिनिटांत होणार! 13.9 किमी फ्रीवेचा कामाला MMRDA कडून सुरुवात, मार्ग कसा आहे?
Thane to South Mumbai Eastern Freeway Project: ठाणे-दक्षिण मुंबईचा प्रवास आता झटपट होणार आहे. 13.9 किमी उंच फ्रीवेचा कामाला सुरुवात झाली आहे. MMRDA ने यासाठी मोठी योजना आखली आहे.
मुंबई : ठाणे ते दक्षिण मुंबई प्रवास करणे लवकरच सामान्य प्रवाशांसाठी खूप सोपे आणि जलद होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बहुप्रतिक्षित एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पाचे बांधकाम अधिकृतपणे सुरू केले आहे. ठाणे आणि मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी हा प्रकल्प गेम-चेंजर ठरेल.

