

Thane News
ESakal
भिवंडी : घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसईदरम्यानचा प्रवास अनेक वर्षापासून त्रासदायक ठरत आहे. विशेषतः जड-अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वाहनचालकांना गर्दीच्या वेळी दोन तासांपर्यंत प्रवास करावा लागतो. या कोंडीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच भिवंडीच्या यंत्रमाग आणि कापड उद्योगाला चालना देण्याची क्षमता असलेल्या गायमुख पायगाव खाडी पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दोन तासांचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासह मालवाहतुकीचा वेग वाढून भिवंडीच्या आर्थिक विकासालाही हातभार लागणार आहे.