
Mumbai Monorail
ESakal
मुंबई : दहा वर्षांपासून रडतखडत चालणारी मोनोरेल शनिवारपासून (ता. २०) अनिश्चित काळासाठी विश्रांतीवर गेली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल सातत्याने बंद पडत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अद्ययावत आणि सक्षमीकरण करण्यासाठी ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या मार्गावरील वडाळा, भक्ती पार्क, म्हैसूर कॉलनी, आरसीएफ, भारत पेट्रोलियम परिसरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. आता त्यांना ‘बेस्ट’सह टॅक्सी, खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार आहे.