एमएमआरडीएचा विस्तार अलिबागपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्‍यातील काही भाग आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, अलिबाग, तसेच खालापूर तालुक्‍याचा काही भाग एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणार आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासास चालना मिळणार आहे. 

मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्‍यातील काही भाग आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, अलिबाग, तसेच खालापूर तालुक्‍याचा काही भाग एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणार आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासास चालना मिळणार आहे. 

वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.  एमएमआरडीएच्या बोधचिन्हाचे, तसेच हरित धोरणाचे अनावरणही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

महामंडळाच्या स्थापनेस मंजुरी
मुंबई परिसरात ‘मेट्रो’च्या अनेक मार्गांची कामे वेगाने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘मेट्रो’च्या संचालनासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळ स्थापण्याचा निर्णय. हे महामंडळ स्वायत्त असेल.

पुढील वर्षी मेट्रो ७ (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)) तसेच मेट्रो २-अ (दहिसर ते डी. एन. नगर) मार्ग सुरू होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर या महामंडळाची स्थापना हे पुढचे पाऊल ठरले आहे.

मेट्रोसोबतच मोनो रेलचे संचालन आणि व्यवस्थापनही हे महामंडळ करेल. या महामंडळाच्या अनुषंगाने सुमारे एक हजार पदे निर्माण करण्याचा निर्णय. 

मेट्रोचे जाळे तयार होणार 
मेट्रो १० (गायमुख, ठाणे ते शिवाजी चौक, मिरा रोड), मेट्रो-११ (वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो १२ (कल्याण ते तळोजा)च्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. 
मेट्रो मार्गांचे अंतर - मेट्रो १० - ११.४ कि.मी., मेट्रो ११ - १४ कि.मी.,   मेट्रो १२ - २५
 या तिन्ही मार्गांसाठी अनुक्रमे ४,४७६, ८,७३९ आणि ४,१३२ कोटींचा खर्च होणार.

बुलेट ट्रेन बीकेसीला जोडणार 
जागतिक व्यापार सेवा केंद्र  आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे-कुर्ला स्थानकाशी जोडण्याचा निर्णय.

या कामासाठी ‘हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’ला अनुक्रमे ४.५ हेक्‍टर आणि ०.९ हेक्‍टर जागेची गरज.

हे दोन्ही प्रकल्प एकत्र आल्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल गतिमान संपर्क क्षेत्रात येणार.

त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार.

या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे विद्यमान निकषांनुसार पुनर्वसन होणार.

विरार ते अलिबाग बहुद्देशीय मार्गावरील (मल्टिमॉडेल कॉरिडॉर) नवघर ते बालावली या टप्प्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेता प्रकल्प अंमलबजावणी घटक स्थापन करण्याचाही निर्णय.

भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कंत्राटदारांची नियुक्ती, संबंधित कायदेशीर बाबींची हाताळणी, विविध परवानग्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांशी समन्वयन, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींच्या पार्श्‍वभूमीवर ते कार्यरत असेल.

वॉर रूमची स्थापना
मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ‘वॉर रूम’च्या  धर्तीवर एमएमआरडीएनेही ‘वॉर रूम ॲण्ड इनोव्हेशन सेंटर’ची स्थापना. 

विविध प्रकल्पांसंदर्भात तातडीच्या प्रसंगी त्वरित निर्णय घेऊन ते मार्गी लावणे, अत्यावश्‍यक आणि मूलभूत स्वरूपाचे संशोधन कार्य हाती घेऊन एमएमआरडीए क्षेत्राच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी या वॉर रूमवर असेल.

एमएमआरडीएत नव्याने समाविष्ट होणाऱ्या परिसरात सर्व क्षेत्रांचा विकास होण्याची मोठी क्षमता आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रांचा सुनियोजित आणि दीर्घकालीन विकास होण्यास मदत होईल.  किमी 
पूर्वीचेया क्षेत्रातील विकास केंद्रांवर आमचा भर असेल. तेच या क्षेत्राच्या विकासाचे गमक ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

विशेष नियोजन प्राधिकरण 
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस परिसराशी निगडित असलेल्या दोन रस्त्यांच्या पार्श्‍वभूमीवर विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना.

बीकेसी आणि हंस भुर्गा मार्गाला जोडणारा २ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग, तसेच बीकेसीतील आगमन-प्रयाण सुलभ व्हावे म्हणून बांधल्या जाणाऱ्या ६९० मीटर लांबीच्या रस्त्यासाठी विद्यापीठाची काही जागा प्राधिकरणास मिळणे गरजेचे.

एमएमआरडीएचे क्षेत्र
4254 किमी पूर्वीचे
6272 किमी यापुढे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MMRDA extension extended to Alibaug