टीएमटीपुढे ‘मेट्रोपीडा’

टीएमटीपुढे ‘मेट्रोपीडा’

ठाणे -  वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पाच्या कामादरम्यान बसविण्यात आलेले अडथळे हे बस थांब्याला लागून आहेत. त्यामुळे सध्या ठाणे परिवहनच्या बसने (टीएमटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडथळ्यांच्या पुढे येऊन थेट रस्त्यावर उभे राहून बस पकडाव्या लागत आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

मेट्रोचे काम किमान दोन-अडीच वर्षे चालेल. त्यामुळे टीएमटीचे धोकादायक ठरत असलेले थांबे बदला, अन्यथा येत्या काळात गंभीर अपघाताला सामोरे जावे लागेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वडाळा-ठाणे मेट्रो-चार प्रकल्पांतर्गत घोडबंदर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठिकठिकाणी अडथळे उभारले आहेत. 

इथे धोक्‍याची शक्‍यता
तीन हात नाका उड्डाणपुलाजवळ, माजीवडा पेट्रोल पंप, आर मॉल, कापूरबावडी या ठिकाणी अत्यंत धोक्‍याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा ट्रक-टेम्पो जलद गतीने येत असतात. त्यामुळे येत्या काळात येथे गंभीर अपघाताला सामोरे जावे लागू शकते.

ज्या ठिकाणी ही समस्या निर्माण झाली आहे, त्या ठिकाणाची माहिती घेण्यात येत आहे. या समस्येविषयी लवकरच आयुक्तांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येईल.
- संदीप माळवी, परिवहन व्यवस्थापक, टीएमटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com