

Ulhasnagar Metro-5
ESakal
उल्हासनगर : मुंबई मेट्रो-५च्या दुसऱ्या टप्प्यात भोईरवाडी ते उल्हासनगर या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे शहराच्या विकासाला नवे पंख मिळणार आहेत. तसेच उल्हासनगरला आधुनिक, जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे.