Mumbai Metro: मेट्रोचा उन्नत मार्ग 'फनेल'च्या कचाट्यात, 'एमएमआरडीए'ला विमानतळ प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा

Metro 7A: 'एमएमआरडीएचा मेट्रो-७ अ मार्ग फनेल झोनच्या कचाट्यात अडकला आहे. यामुळे वाढीव उंचीला एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून मंजुरी मिळेल का, असा असे प्रश्न 'एमएमआरडीए' समोर उभा राहिला आहे.
MMRDA

MMRDA

ESakal

Updated on

मुंबई : दहिसरवरून मेट्रोने आलेल्या प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचता यावे, म्हणून 'एमएमआरडीए'कडून उभारल्या जात असलेला मेट्रो-७ अ मार्ग फनेल झोनच्या कचाट्यात अडकला आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या मागपैिकी सुमारे एक किमीच्या उन्नत मार्गाच्या ओव्हरहेड वायर (ओएचई) आणि एअरपोर्ट कॉलनी मेट्रो स्थानकाच्या छतामुळे हवाई सुरक्षेचे (फनेल झोन) उल्लंघन होत आहे. त्यामुळे वाढीव उंचीला एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून मंजुरी मिळेल की केलेल्या कामाची तोडफोड करावी लागेल, असे प्रश्न 'एमएमआरडीए' समोर उभा राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com