

Metro 4 Route Under Review After Mulund Mishap Says MMRDA
Esakal
बापू सुळे, मुंबई : मुलुंड येथे शनिवारी मेट्रो-४ मार्गिकवर स्लॅब कोसळून झालेल्या अपघाताची एमएमआरडीएने धास्ती घेतली आहे. 'दूध पोळल्याने ताकही फुंकून पिणार' या उक्तीप्रमाणे केवळ अपघाताबाबत चौकशी न करता एमएमआरडीने वडाळा ते कासारवडवली या संपूर्ण ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल १३ अधिकाऱ्यांचे पथक तयार केले असून, सोमवारपासून पुढील तीन ते चार दिवस हे काम चालणार आहे.