
MMRDA Plan To Ease Traffic Jam
ESakal
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असून, सायंकाळी तर परिस्थिती बिकट बनत आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करूनही फारसे यश मिळत नाही. त्यामुळे संकुलात येणाऱ्या वाहनांवर वाहतूक कोंडी शुल्क आकारण्याचा विचार आहे. त्याबाबत एमएमआरडीएच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारची शुल्क आकारणी व्यवहार्य ठरेल का, याबाबत सल्लागाराच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.