'एमएमआरडीए'ची रिलायन्सवर मेहेरनजर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचा सन 2016 - 17 या आर्थिक वर्षाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात आला. कॅगच्या या अहवालात एमएमआरडीएवर वसूली आणि भोगवाटा प्रमाणपत्रे देताना पक्षपातीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिजला फायदा होईल, असे काम 'एमएमआरडीए'कडून झाले असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. रिलायन्सने नियमाचा भंग केल्यानंतर रिलायन्सकडून पैसे वसूल करणे अपेक्षित असताना एमएमआरडीएने तसे न करता रिलायन्सला भोगवाटा प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडे असलेली 312 कोटी आणि व्याजाची 154 कोटींची रक्कम भरलेले नाही. तर दुसरीकडे इतर कंपन्याकडून मात्र हे पैसे वसूल करण्यात आले आहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकने (कॅग) सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचा सन 2016 - 17 या आर्थिक वर्षाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात आला. कॅगच्या या अहवालात एमएमआरडीएवर वसूली आणि भोगवाटा प्रमाणपत्रे देताना पक्षपातीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. रिलायन्स इंडस्ट्रिला फायदा होईल असे निर्णय घेतले आणि तशाच दुसऱ्या प्रकरणांमध्ये मात्र जेट एअरवेज आणि ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कमिशन यांसह इतर विविध राष्ट्रीयीकृत बँका, शासकीय संस्था यांच्याकडून मात्र पैसे वसूल करण्यात आले आहे. 

Web Title: MMRDA Target Reliance Bandra Kurla Coplex