Mumbai Metro
Mumbai Metro

Mumbai Metro: ‘मेट्रो-२बी’वर चाचणी सुरू, लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, कोणत्या स्थानकांचा समावेश?

MMRDA Update: एमएमआरडीएने मेट्रो-२बी मार्गिकेच्या मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानच्या मार्गिकेवर चाचण्या सुरू केल्यी आहेत. सीआरएमएस चाचणीत मेट्रो पास झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या मेट्रो-२बी मार्गिकेच्या मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेवर आजपासून (ता. १०) मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएमएस) उपस्थितीत चाचण्या सुरू होणार आहेत. एमएमआरडीएने गेली सहा महिने त्यांच्या स्तरावर चाचण्या घेतल्या आहेत. आता सीआरएमएस चाचणीत मेट्रो पास झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगराचा परिसर जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मंडाळेदरम्यान २३ किलोमीटरची लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो ते चेंबूरच्या डायमंड गार्डनदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या मार्गावर १४ एप्रिलपासून चाचण्या सुरू आहेत. त्यात सर्व बाबी सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंंतर एमएमआरडीएने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थित चाचण्या घेण्याबाबतचे पत्र दिले होते.

Mumbai Metro
अमेरिकन नागरिकत्व मिळवणारा पहिला भारतीय कोण? वाचा 'या' कायदेशीर लढाईची कहाणी...

कोणत्या स्थानकांचा समावेश?

  • मंडाळे डेपो

  • मानखुर्द

  • बीएसएनएल मेट्रो

  • शिवाजी चौक

  • डायमंड गार्डन

ठाण्यातून मेट्रोने गाठा दक्षिण मुंबई

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेट्रो ११ मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचे सक्षम जाळे उभे राहणार आहे; ठाण्याहून मेट्रो चारने निघालेल्या ठाणेकरांना वडाळा स्थानकातून मेट्रो ११तून पुढे दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणे सुलभ होणार आहे.

Mumbai Metro
Eknath Shinde: दहिसर ‘टोल’चे स्थलांतर होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मध्य रेल्वे लाइफलाइन समजली जाते तर लोकलच्या घड्याळावर धावणारा कामगार वर्ग मुंबईचा आत्मा समजला जातो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थेट ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कसारा- कर्जतपर्यंत हे जाळे पसरले आहे. कितीही जीवघेणा प्रवास असला तरी त्याला पर्याय नसल्याने दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन लोकलने प्रवास करतात. लोकलचा हा भार कमी करण्यासाठी मुंबई-ठाण्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यापैकी मेट्रो चार हा मार्ग वडाळा- घाटकोपर- ठाणे कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. ठाण्यात या मार्गाची चाचपणी सप्टेंबरअखेरचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com