

Thane Coastal Road-2
ESakal
मुंबई : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून तब्बल ७.३ किलोमीटर लांबीचा मुलुंड पूर्व येथील आनंदनगर ते बाळकुमदरम्यान कोस्टल रोड दोन उभारला जाणार आहे. ठाणे खाडीकिनारी भागातून हा प्रकल्प जाणार असल्याने त्याला मंजुरी मिळावी म्हणून एमएमआरडीएने किनारी नियमन क्षेत्राकडे (सीआरझेड) मंजुरीसाठी अर्ज केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ठाण्याच्या कोस्टल रोड २ला वेग येईल.