
मुंबई : मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सहा मेट्रो प्रकल्पांसमोरील आर्थिक निधीची वानवा आता पूर्णपणे संपणार आहे. मेट्रो प्रकल्प ५, ६, ७ अ, ९, १० आणि १२ या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेला निधी एमएमआरडीए कर्ज रूपाने उभारणार आहे. मात्र राज्य सरकारने त्या कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारणे आणि परतफेडीच्या अनुषंगाने थकहमी देणे आवश्यक होते. त्यानुसार सरकारने दोन्ही बाबींना मंजुरी दिल्याने आता एमएमआरडीएला सहजपणे कर्ज रूपाने उभारता येणार आहे, परिणामी संबंधित मेट्रो प्रकल्पांच्या कामाला आणखी वेग येणार येईल.