मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक

मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक

मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसह मुजोर फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या पालिकेच्या जी-उत्तर कार्यालावर मोर्चा काढला.

गेल्या सोमवारी सोहनीलाल नामक परप्रांतीय फेरीवाल्यांनी रागाच्या भरात एका ग्राहकावर चाकूने प्राणघातक हल्ला करत खून केला होता.अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी यासाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पालिकेच्या जी - उत्तर कार्यालावर मोर्चा काढण्यात आला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर क्षेत्राच्या आत बसत आहेत,यात बिहारी व बांगलादेशी अनधिकृत फेरुवाल्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.मुंबईतील अशा सर्व मुजोर व नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेने पालिका प्रशासन व पोलिसांना दिले.

याबाबत येत्या 15 दिवसांत अशा फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे आश्वासन जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com