बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीचे काम मनसेकडून बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

स्थानिकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मनसे आक्रमक झाली. आज (सोमवार) मुंब्रा येथील शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेले काम ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलटे ट्रेनच्या जमीन मोजणीला विरोध करण्यात आला. मुंब्रा येथील शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरु असलेले जमीन मोजणीचे काम मनसेकडून बंद पाडण्यात आले.

स्थानिकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मनसे आक्रमक झाली. आज (सोमवार) मुंब्रा येथील शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेले काम ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले. बुलेट ट्रेनची आवश्यकता का आहे, असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जमिनीचा मोबदला देण्याची मागणी करत मुंब्रा येथील कार्यालयात गोंधळ घातला.

Web Title: MNS agitation against Bullet train project