मंत्रालयाच्या गेटवर मनसेने खोदले रस्ते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच खड्डा खोदून आंदोलन केले. यामुळे खड्डेमुक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच खड्डा खोदून आंदोलन केले. यामुळे खड्डेमुक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातल्या खड्डेयुक्त रस्त्यांचा जाहीर निषेध आणि सर्वसामान्यांना जो खड्ड्यांचा त्रास होतो तोच त्रास सत्ताधारी, निष्क्रिय युती सरकार मधील मंत्र्यांनाही व्हावा यासाठी मनसैनिकांनी हे आंदोलन केले आहे. 

बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मंगळवारी पहाटे मनसे सैनिकांनी थेट मंत्रालयासमोरच खड्डे खोदले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 4 मनसैनिकांना मंत्रालयाच्या आवारातूनच ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: mns agitation in front of matralaya dug the road