

Vasai Virar Municipal Corporation Election
ESakal
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. निवडणुकीच्या तयारीदरम्यान वसई-विरार महानगरपालिका (VVMC) बाबत एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी यांनी वसई-विरार महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.